banner 728x90

‘स्मार्ट सिटी’ शहर बससेवेत औरंगाबाद देशात अवलस्थानी

banner 468x60

Share This:

औरंगाबाद : सलमान शेख – स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराने सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बससेवा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. अर्बन मोबिलिटी या प्रकारात औरंगाबाद स्मार्ट सिटीने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. औरंगाबाद पाठोपाठ सुरत दुसऱ्या तर अहमदाबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयातर्फे शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता विडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. स्मार्ट सिटी मिशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा, संचालक कुणाल कुमार याच्या उपस्थितीत पाच वेगवेगळ्या प्रवर्गात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे सहभागी झाले होते. त्यात औरंगाबाद स्मार्ट सिटीला ‘माझी स्मार्ट बस’ साठी प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आले आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 2018 साली शहरात सार्वजनिक बससेवा सुरू करण्यात आली होती. याचे शुभारंभ युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. सध्याच्या घडीला 100 बसेस 32 प्रमुख मार्गावर नागरिकांना सेवा प्रधान करीत आहे. आतापर्यंत 87 लाख प्रवाशांनी बससेवाचाया लाभ घेतला आहे.
शहरात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यावर या स्मार्ट बसने महत्वाची भूमिका बजावली आहे. कोरोना रुग्णांना ने-आण करणे, कोरोना योद्धांना ने-आण करणे अशी महत्वाची कामगिरी माझी स्मार्ट बसने केली आहे. 

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!