डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. रात्री 11 वाजता राजभवनावर जाऊन राज्यपाल बेबी रानी मौर्या यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. रात्री 9.30 वाजता रावत यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. मात्र त्यात त्यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल काहीच सांगितले नव्हते. त्यांनी फक्त आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. तीरथ सिंह रावत हे फक्त 4 महिन्यांचे मुख्यमंत्री ठरले आहेत.
अखेर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा
आज केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, भाजपचे प्रदेश प्रभारी दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीत भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्यातून एका आमदाराची निवड मुख्यमंत्री म्हणून केली जाईल. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. यापैकी भाजपचे 57 आमदार आहेत. गंगोत्रीची भाजपची एक जागा अजून रिक्त आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर रावत यांना 6 महिन्याच्या कालावधीत विधिमंडळावर निवडून येणं गरजेचं होतं. पण कोरोना संकटामुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे रावत यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. रावत यांनी दिल्लीत शुक्रवारी संध्याकाळी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांकडे आपला राजीनामा सादर केला.
घटनात्मक पेच निर्माण झाल्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानतो, असे रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले.
Recommendation for You

Post Views : 56 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 56 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 56 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 56 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












