लखनऊ : सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांच्या विरोधात न्यायालयात खटल्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना व्हॅक्सिन कोव्हिशील्ड घेऊनही शरीरात अँटीबॉडीज तयार होत नसल्याने हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर न्यायालयात संबंधित पोलीस स्टेशनमधून अहवाल घेतला आहे. यावर पुढील सुनावणी 2 जुलै रोजी करण्याचे आदेश देण्यात आलेत.
कोरोना लस घेतल्यानंतरही अँटिबॉडीज तयार होत नसल्याने
8 एप्रिल रोजी वकिल प्रताप चंद्र गोविंद यांनी हॉस्पिटलमध्ये कोव्हिशील्ड व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर त्यांनी 28 एप्रिलला दुसरा डोस होता. मात्र व्हॅक्सिन घेतल्यानंतरही त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यानंतर त्यांनी 25 मे रोजी अँटीबॉडीज टेस्ट केली. मात्र त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाले नाही. सामान्य प्लेटलेटही कमी झाले. ज्यामुळे त्यांना संक्रमणाचा धोका वाढला. त्यामुळे या प्रकरणी अदार पूनावाला यांच्या विरोधात प्रताप चंद्र यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.
एफआयआर दाखल करण्यासाठी वकिल प्रताप चंद्र यांनी अदार पूनावाला यांच्यासहित 7 लोकांची नावं न्यायालयात दिली आहेत. या अर्जात केंद्रीय औषध मानक नियंत्रण, आयसीएमआरचे महासंचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव, राष्ट्रीय आरोग्य मिशन उत्तर प्रदेशचे संचालक, गोविंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लखनऊ यांचे संचालक यांनाही विरोधी पक्ष करण्यात आले आहेत.
प्रताप चंद्र यांनी या सर्वांविरोधात न्यायालयात फसवणूक आणि हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे. न्यायालयानं या प्रकरणी पोलीस स्टेशनमधून अहवाल मागवला असून पुढील सुनावणी 2 जुलै रोजी होणार आहे.
Recommendation for You

Post Views : 35 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 35 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 35 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 35 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…