नवी दिल्ली : मॉडर्नाची कोरोना लस भारतात मर्यादित आणि तातडीच्या वापरासाठी आयात करण्याची परवानगी सिप्ला या औषध कंपनीला देशाच्या औषध नियंत्रकांनी म्हणजेच डीसीजीआयने दिली आहे. असे निती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सिप्ला या मोडर्नाच्या भागीदारी कंपनीकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर मॉडर्नाच्या कोरोना लसीला औषध नियंत्रकांनी मर्यादित वापरासाठी मजुरी दिलेली आहे.
देशात कोरोनावरील चौथ्या लसीच्या आयातीस डीसीजीआयची मंजुरी
डॉ.पॉल म्हणाले की, मॉडर्नाला साथ महिन्यापर्यंत उणे 15 ते 25 अंश तापमानावर ठेवले जाऊ शकते. 30 दिवसांपर्यंत या लसीला 2 ते 8 अंश तापमानावर ठेवले जाऊ शकते.इतर लसीप्रमाणे 28 दिवसांनंतर तिची दुसरी मात्रा देता येते.
गर्भवती महिलांना लवकरच लस
आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गर्भवती महिलांनाही कोरोना लसीपासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही. विशेषज्ञ समितीने गर्भवती महिलांना कोरोना लस घेण्यास परवानगी दिली आहे. लवकरच मार्गदर्शक सूचना दिला जातील.
देशातील 111 जिल्ह्यात धोका कायम
देशातील 111 जिल्ह्यात रोज 100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहे. हा चिंतेचा विषय असून कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आजही कोरोनाचा धोका कायम आहे.
Recommendation for You

Post Views : 59 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 59 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 59 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 59 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












