banner 728x90

वाघाडी ग्रामपंचायतीच्या दप्तराची ‘ गटविकास अधिकारी’ करणार तपासणी ; गैरप्रकार आणि अनियमतता उघड होण्याची शक्यता?

banner 468x60

Share This:

पालघर योगेश चांदेकर

वाघाडी ग्रामपंचायतीच्या दप्तराची ‘ गटविकास अधिकारी’ करणार तपासणी
गैरप्रकार आणि अनियमतता उघड होण्याची शक्यता?
ग्रामपंचायत सदस्याच्या पतीची निवडही चर्चेत

banner 325x300

पालघरः बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता फसवणूक करण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनावट दाखला बनवल्यामुळे अडचणीत आलेला कर्मचारी, त्याला पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांची आता पोलखोल होण्याची शक्यता आहे. वाघाडी ग्रामपंचायतीच्या बनावट दाखल्याचे प्रकरण आता चांगलेच गाजत असून या प्रकरणात गटविकास अधिकारी हेमंत गरिबे हे सर्वंकष चौकशी करणार आहेत.
वाघाडी ग्रामपंचायतीची दप्तर चौकशी होणार असल्यामुळे या ग्रामपंचायतीतील अनेक गैरकारभार आणि अनियमित्ता पुढे येण्याची शक्यता आहे. वाघाडी ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. संदीप बसवत हा पूर्वी डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करीत होता. असे असताना त्याची पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली.

सदस्याचा पती डाटा एन्ट्री ऑपरेटर
ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर नवनियुक्त सदस्यांचा कारभार सुरू झाला. त्यातील ग्रामपंचायतच्या एका सदस्याच्या पतीची डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती झाली. हा कर्मचारी थेट ग्रामपंचायतीचा पगार घेत नसला, तरी ग्रामपंचायतीच्या निधीतून संबंधित एजन्सीला पगार दिला जातो आणि ही एजन्सी ग्रामपंचायत सदस्याच्या पतीचा पगार करते. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या हे पद लाभाचेच आहे.

सदस्य पतीची नियुक्ती करण्यामागे हेतू काय?
पंचायत समिती जरी संबंधित ग्रामपंचायतीला अशा प्रकारचा कर्मचारी नेमण्याचा अधिकार असल्याचे सांगत असले, तरी नवयुक्त ग्रामपंचायत सदस्याचा पती अन्य विभागात न घेता त्यालाच डाटा एन्ट्री ऑपरेटर का केले, त्या पाठीमागे अन्य काही हेतू होते का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ग्रामपंचायत सदस्याच्या पतीमार्फत काही बोगस दाखले दिले का? याचीही आता चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

नियम काय सांगतो?
डाटा एन्ट्री ऑपरेटरची जागा खासगी एजन्सी भरत असली, तरी त्याची शिफारस ग्रामपंचायतीने करायची असते. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर डाटा एन्ट्री ऑपरेटरची जागा तयार करण्यात आली. त्यासाठी संदीप बसवतची बदली करण्यात आली.त्या दरम्यान बसवत याने ऑपरेटर पदाचा राजीनामा दिला होताका मग ग्रामपंचायत सदस्याच्या पतीची शिफारस या जागेसाठी कशी करण्यात आली. त्यामुळे संबंधित एजन्सीने त्याची नियुक्ती कशी केली असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत डाटा एन्ट्री ऑपरेटर अनुभवी असावा लागतो;परंतु अनुभवी कर्मचाऱ्याला अन्य विभागात टाकून ग्रामपंचायत सदस्याच्या पतीची निवड करण्यामागे काही वेगळा हेतू आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ग्रामसेवकाचीही चौकशी
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्या आदेशानंतर आता गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांची भूमिका बदलली असून, पूर्वी ग्रामसेवकाला पाठीशी घालणारे गरिबे आता वाघाडी ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर मृत्यूचा बनावट दाखला तयार करणे, कागदपत्रांची शहानिशा, लॉगिन, पासवर्ड, ओटीपी आदींबाबत ग्रामसेवक विजया हांडवा यांची चौकशी केली जाऊ शकते.

ग्रामपंचायत सदस्यांचे दणाणले धाबे
बसवत याच्यावर जबाबदारी ढकलून ग्रामसेवकालाही मोकळे होता येत नाही. वाघाडी ग्रामपंचायत सुशोभीकरणाची काही कामे चांगली झाली असली, तरी त्यासाठी कोणता निधी वापरला, ‘पेसा’च्या निधीचा कोठे वापर झाला, गेल्या दोन वर्षात कोणती कामे झाली, त्यात अनियमित होती का, याची आता चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!