औरंगाबाद : सलमान शेख – औरंगाबाद मनपा हद्दीत कोरोना न झालेल्या तसेच कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या त्या 4 लाख जणांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत धोका अधिक आहे. असा अंदाज मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी वर्तवला आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त जणांनी कोरोनाची लस घेतली पाहिजे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी शहरातील जनतेला केले. कोरोनाची तिसरी लाट येणार अशी विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाचा अंदाज आणि तयारी याविषयी आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘त्या’ चार लाख नागरिकांना धोका अधिक
ते म्हणाले की, 1 जूनपासून शहरात कोरोनाची दुसरी लाट सौम्य झाली आहे.दररोजची रुग्णसंख्या ही 25 ते 35 अशी वाढत आहे. मागील काही दिवसात रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण कमी होता. मात्र त्यात आता वाढ झाली आहे. शहरात 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या 10 लाख आहे. त्यापैकी 3 लाख 40 हजार जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. तर सुमारे 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. त्यांच्यात अँटिबॉडीज तयार झालेल्या असतीलच. सुमारे दीड लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे सहा लाख नागरिकांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग फार कमी प्रमाणात होऊ शकतो.
Recommendation for You

Post Views : 32 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 32 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 32 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 32 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…