गंगापूर : सलमान शेख – दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि खाद्य तेलाचे वाढत्या भावाच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेल हे जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत. केंद्र सरकार पेट्रोल मागे 33 तर डिझेल मागे 32 रुपये टॅक्स आकारत आहे. तर राज्य सरकार देखील व्हॉटच्या नावाखाली पेट्रोल मागे 25 रुपये तर डिझेल मागे 22 रुपये टॅक्स आकारत आहे. एकीकडे कोरोनामुळे बेरोजगारीत वाढ झाली असून, अनेकांचे जगणे हालाकीचे झाले आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकार मिळवून खाद्यतेलाचे भाव वाढवत आहे. त्यामुळे ऐकीकडे कामाला हात नाही आणि केंद्र आणि राज्य सरकार मिळवून सर्वसामान्यांचे जगणे हालाकीचे करत असल्याने, मायबाप सरकारने आता तरी जीवनावश्यक वस्तूत 25 टक्के कपात करावी अशी मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आली. यावेळी एमआयएम पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे, फैसल बासोलान, वैभव खाजेकर यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.