मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले होते. सावंत सध्या अंधेरी पूर्व येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांनी 16 जानेवारीला पहिला तर 16 फेब्रुवारीला कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता. तरीसुद्धा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना टेस्टिंग करून घ्यावी, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.