banner 728x90

30 जूनच्या आत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करा – महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

banner 468x60

Share This:

औरंगाबाद : (सलमान शेख) पिक कर्जाची रक्कम नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. त्यामुळे या निर्णयाची ग्रामीण स्थरावर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे तसेच मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेऊन, 30 जूनच्या आत कर्जवाटपाची प्रक्रिया पूर्ण व्हावी. असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!