banner 728x90

Dahanu Blast Update: सदरहू कंपनीने नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी; अन्यथा पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करू- आमदार निकोले

banner 468x60

Share This:

डहाणू : योगेश चांदेकर- डहाणू डेहणे-पळे येथे झालेल्या फटाका कंपनीच्या स्फोटकाच्या घटनास्थळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. डहाणू, डेहणे-पळे येथील फटाका कंपनीत आज सकाळी 11 दरम्यान आग लागून मोठा स्फोट झाला होता. या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने सुमारे 10 ते 15 किलोमीटर पर्यंत घरांना हादरे बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. 

याची सर्व प्रथम आमदार कॉम्रेड विनोद निकोले प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पोहचले व लगेच रुग्णवाहिका, अग्निशामक दल आदी यंत्रणा सज्ज केली. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठविले. तर अती गंभीर असलेल्यांना गुजरात येथील वापी मधील हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. स्फोटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी पत्रे उडाले तर काही ठिकाणी खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. 
या घटनेत नुकसान झालेल्यांना सदरहू कंपनीने भरपाई घ्यावी.असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले. अन्यथा याविषयी येत्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करू असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माकपचे कॉ.रडका कलांगडा,कॉ.चंद्रकांत घोरखान, डॉ.आदित्य अहिरे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक नलावडे, एटीएसचे अधिकारी, प्रांताधिकारी मित्तल, तहसीलदार राहुल सारंग, कॉ. हरिश्चंद्र गहला, कॉ. विजय दांडेकर, कॉ. दत्ता भोंडवा, कॉ. उल्हास भोंडवा, कॉ. दत्तू दुमाडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!