डहाणू : योगेश चांदेकर- डहाणू तालुक्यातील कासा मुख्य ते विठ्ठलनगर या 10 लाखांच्या आमदार निधीतून झालेल्या रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. ठेकेदाराने आणि अन्य काही जणांनी मिळवून, कासा मुख्य ते विठ्ठलनगर या रस्त्याचे मंजूर झालेले काम न करता, दुसऱ्या ठिकाणी रस्ता तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी जुना रस्ता होता, त्यावरच पुन्हा हलक्या दर्जाचे काँक्रीटीकरण करून पैसे लुबाडण्यात आले आहे. त्यात झालेला रस्ता तोही अवघ्या एका वर्षात खराब झाला आहे. ठेकेदाराने कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून, रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना हलक्या प्रतीचे मटेरियल त्यात वापरण्यात आले आहे. रस्ता निर्मिती करतांना खाली डबर सोलिंग करणे अनिवार्य असते मात्र; ते न करता फक्त काँक्रीटीकरण करून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
डहाणू तालुक्यात रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार, ठेकेदारावर कारवाई होणार का?
ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारावा आणि त्यात विशेष लक्ष घालून रस्ते ठीकठाक करावे असे आदेश 4 फेब्रुवारी 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाची अनेक ठिकाणी पायमल्ली होतांना दिसत आहे. डहाणू तालुक्यात अशा अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक रस्त्याची चौकशी झाली पाहिजे.
सरकारकडून आलेल्या निधीत ठेकेदार वेळोवेळी भ्रष्टाचार करतात, कामात हलक्या आणि स्वस्त प्रतीचे वस्तू वापरतात आणि मोठा प्रमाणात शासनाकडून आलेला निधी आपल्या खिशात घालतात.आणि उच्च स्तरीय अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतो. त्यामुळे अशा ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकायला पाहिजे आणि त्याला अदा केलेल्या बिलाची रिकव्हरी केली पाहिजे, जेणे करून यानंतर कोणताही ठेकेदार भ्रष्टाचार करणार नाही. आणि कामही चांगल्या दर्जाचे होईल. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष न करता तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून, जर भ्रष्टाचार निघाला तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे डहाणू पंचायत समितीचे बांधकाम विभाग शाखा अभियंता रवींद्र गोतारणे यांनी सांगितले आहे.
Recommendation for You

Post Views : 31 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 31 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 31 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 31 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…