शिवसेनेचे युवा नेते महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर जिह्यात अविरत कार्य करण्याऱ्या डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांनी केलेल्या मागणीनुसार शिवसेनेचे कुंदन संखे यांनी हॅन्डग्लोज, सैनिटायजर च्या स्वरूपात वैद्यकीय मदत आरोग्य अधिकारी डॉ . पांचाळ यांना सुपूर्द केली तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते केक कापून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या संघर्षात पालघर जिह्यात शिवसेनेचे कुंदन संखे यांनी विविध समाजघटकांना सर्वोतोपरी सातत्यपूर्ण सहकार्य केले असून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या सहकार्याबाबत आरोग्य अधिकाऱयांनी आभार व्यक्त केले.
सदर प्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हा समन्वयक प्रभाकर राऊळ, उपतालुकप्रमुख गिरीश राऊत, सरावली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक साळुंके , उपतालुकाप्रमुख वैभव भोईर, डॉ. पांचाळ, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते.