banner 728x90

पालघरच्या या आदर्श गावात शिरलाच नाही कोरोना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असे कौतुक !

banner 468x60

Share This:

 पालघर (योगेश चांदेकर यांजकडून ) करोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला असताना  विक्रमगड तालुक्यातील कोंड्गांव ग्रामपंचायतीने  केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.  या काळात या गावाने एक अनोखा विक्रमच प्रस्थापित केला आहे.   

               कोंडगाव या गावात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकही करोना विषाणू रुग्ण सापडला नाही. त्याच पार्श्वभूमीवर गावाने केलेल्या विक्रमाचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालघर जिल्हयातुन निवडलेल्या चार तालुक्यातील ग्रामपंचायतीपैकी कोंडगांव ग्रामपंचायत सरपंच सौ. मंजु कोंब यांना बोलण्याची संधी दिली.  मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचे व गावच्या एकजुटीचे कौतुकही केले.   
                  कोणत्याही महामारीच्या काळात लोकांना विश्वासात घेऊन काम करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते; तरच आपण मदत कार्य करू शकतो ही भावना मनात ठेऊन आपण काम केले यात ग्रामस्थांनी देखील आपणस वेळोवेळी सहकार्य केले त्यामुळे गावात कोरोना शिरलाच नाही . गावात एकही करोना बाधित रुग्ण नसणे  हाच आदर्श आमच्या  गावाने जगासमोर ठेवला आहे असे या गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक अभिमानाने सांगतात.
        “गाव म्हणजे आपले दुसरे कुंटुंब” असे समजून सगळे गावकरी एकजुटीने राहतात.कोंडगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या अवघी  3301असुन ते 100%आदिवासी बहुल गाव आहे. तेथे संरपंच म्हणून सौ. मंजु कोंब सध्या  कार्यरत आहेत. त्यांना या कामात मदत केली ती गावचे ग्रामसेवक विपीन पिंपळे यांनी  . पिंपळे याना ग्राम विकास क्षेत्रात काम करण्याचा १५ वर्षांचा अनुभव आहे.    त्यांनी 15 वर्षात विविध योजने अंतर्गत 8 ते10 वर्ष ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार मिळवुन दिले आहेत.  निर्मल ग्राम पुरस्कार ,तंटा मुक्त ग्राम पुरस्कार ,संत गाडगेबाबा ग्राम, स्वच्छता अभियान,थशवंत पंचायत राज पुरस्कार ,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदारी मुक्त गाव पुरस्कार ,पर्यावरण विकास रत्न पुरस्कार ,आदर्श ग्रामसेवक पुरस्कार ,स्मार्ट ग्राम पुरस्कार , आय एस ओ ग्रामपंचायत ,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त गाव पुरस्कार असे अनेक पुरस्कार  ग्रामपंचायतीला मिळवून दिले आहेत; कालांतराने त्यांची बदली विक्रमग़ड तालुक्यात  कोंडगांव येथे झाली. तोच वारसा घेऊन  विक्रमग़ड तालुक्यात कोंडगांव येथे विकासाची अनेक कामे करायला त्यांनी सुरुवात केली आहे. ” गावचा विकास करणे” हेच त्यांचे ध्येय आहे; यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. 
        पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचे काम अविरतपणे करणार आहे असे ग्राम विकास अधिकारी विपिन पिंपळे यांनी सांगितले आहे.
 

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!