मुंबई. – पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकार ने त्वरित घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकार ची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका त्यांच्या
संयमाचा अंत पाहू नका असा गंभीर ईशारा आज ना.रामदास आठवले यांनी दिला.
पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे दि. 1 जून ते 7 जून आंदोलन सप्ताह राज्यभर पाळण्यात आला. आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.