banner 728x90

स्थलांतरित कामगारांना स्मार्ट रेशनकार्ड; महाराष्ट्रात रास्त भावात धान्य, कुठल्याही राज्यातले असलात तरी रेशन मिळणार

banner 468x60

Share This:

मुंबई : देशातील कुठल्याही राज्यातील कामगार असला तरी त्या कामगाराला महाराष्ट्रात रास्त भावात धान्य मिळणार आहे. यासाठी कामगारांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले आहेत.

अन्नधान्य वाटपात लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत, सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधा पत्रिकांचे वितरण करण्यात यावे. लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक गोदाम’ उभारण्याची कार्यवाही सुरू करावी. वाहनांचे जिओ टॅगीग करावे, अन्नधान्य वाटपात ‘एक देश एक शिधापत्रिका’ धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपात प्राधान्य देण्यात यावे. गरजू लाभार्थ्यांचा सण उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. या वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

banner 325x300

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना

आगामी वर्षात २५ लक्ष नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेत समावेशन करून त्यांचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्यात यावे.

मागील ६ महिन्यांत एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी.

शिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळाव्यात, १०० पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करावी.

संगणकीकृत न झालेल्या १४ लक्ष लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात यावी.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!