मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला ‘दबंग 3′ हा आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच चाहते चित्रपटातील नव्या गाण्यांची आतुरतेने वाट पाहत होते.
बहुप्रतिक्षीत ‘मुन्ना बदनाम हुआ’ या गाण्याचं टिझर प्रदर्शित झालं आहे. या टिझरमध्ये सलमान आपल्या दबंग अंदाजात नृत्य करताना दिसत आहे.
सलमानने स्वत:च्या आवाजात गायलेल्या या नव्या गाण्याबाबत ट्विट करुन आपल्या चाहत्यांना माहिती दिली. सलमानचा आवाज, बादशाहचा रॅप आणि चुलबुलचा दबंग अंदाज ऐका, असं म्हणत सलमानने या टिझरचा व्हीडीओ पोस्ट केला आहे.
दबंग 3 हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.