banner 728x90

चिंचणीत उपसरपंच पदी मंजूषा चुरी; सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची सरशी

banner 468x60

Share This:

पालघर : योगेश चांदेकर – डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजूषा चुरी यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. त्यामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीकडून धोबीपछाड दिल्याची चर्चा आहे. उपसरपंच पदाच्या या निवडणुकीत सेनेच्या जिल्हा नेतृत्वाला गाफीलपणाचा फटका बसला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या रणनीतीचा विजय असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

बुधवार ( दि 16 जुलै) रोजी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश धोडी यांच्या अध्यक्षतेखाली व डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वसंत अहिरे ,चिंचणी ग्रामपंचायतिचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी रवींद्र थोरात यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडनुक संपन्न झाली. उपसरपंच भानुशाली यांचे आकस्मिक निधन झाल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. त्यासाठी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती. 
या निवडणूक प्रक्रियेत शिवसेनेचे करण बारी वॉर्ड 1 (अ) , राष्ट्रवादी कांग्रेसच्या मंजुषा चुरी 4 (ड) व कासीम मुछाले वार्ड 6 (ई) अशा तीन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते. त्यातील कासीम मुछाले यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने दुहेरी लढत पाहायला मिळाली.  दुपारी एक ते सांध्याकाळी चार वाजे पर्यंतच्या सुमारास ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने संपन्न झाली.यावेळी राष्ट्रवादीचे करण ठाकूर, अमीत चुरी, रफीक घाची, तसेच देवानंद शिंगडा, प्रशांत आकरे, नीतेश दुबळा, संजय काठे, उपस्थित होते.
दरम्यान, या निवडणुकीत मंजुषा चुरी यांना 17 मतापैकी एकूण 11 मते मिळाली तर करण बारी यांना एकूण 6 मते मिळाली. राष्ट्रवादी यांच्या सदस्यांनी आपले मत चुरी यांच्या पारड्यात टाकल्याने बहुमत असूनही सेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला.यामध्ये राष्ट्रवादी करिता  अमीत चुरी  यांनी आपली महत्वाची भूमिका बजावत डहाणू तालुक्यातील सगळ्यात मोठी अशी समजली जाणाऱ्या चिंचणी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज करण्यास यशस्वी ठरले आहेत.
डहाणू तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीत शिवसेना पक्षामध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू असून वरिष्ठ अनुभवी पदाधिकाऱ्यांना डावलून जिल्यातील शिवसेना नेतृत्व दुर्लक्ष करत असल्याचे शिवसैनिकांना वाटते. गाफील असलेले जिल्हा नेतृत्व हेरून माजी आमदार आनंद ठाकूर यांनी दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या गटाला एकत्र करून रणनीती आखली. मंजूषा चुरी यांना उपसरपंच पदी निवड करून ठाकूर यांनी सेनेला धोबीपछाड दिला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!