कल्याण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज कल्याण-डोंबिवली शहराला भेट दिली. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासावर त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेवर टीका केली. कल्याण- डोंबिवलीत शिवसेनेचेच खासदार, पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते लोकांची सेवा कधी करणार? असा सवाल देखील प्रवीण दरेकरांनी शिवसेनेला विचारला.
Home
पालघर
मुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री तुमचेच, मंग लोकांची सेवा कधी करणार? दरेकरांचे शिवसेनेवर टीकास्त्र
मुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री तुमचेच, मंग लोकांची सेवा कधी करणार? दरेकरांचे शिवसेनेवर टीकास्त्र
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना सत्ता उपभोगत असून, शहराचा खासदार, शिवसेनेचा पालकमंत्री आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तरीही आता जर विकास झाला नाही तर लोकांनी भरभरून मते दिली आहेत. त्यांची सेवा कधी करणार? इतर शहरांत कोरोनाची लस उपलब्ध होते. इतर महापालिका 25 ते 30 हजार लसी उपलब्ध करीत आहेत. त्या तुलनेत इथे लसीकरण अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. एकीकडे खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. तर नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेने लस खरेदी केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.
मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू कराव्यात यासाठी आम्ही आंदोलन करू. हातावर पोट भरणारा कर्मचारी वर्ग कर्जत-कसारा ठाण्यापर्यंत राहतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्र्यांचीही भेट घेऊ, असेही दरेकर म्हणाले.
Recommendation for You

Post Views : 51 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 51 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 51 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 51 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












