banner 728x90

राहुल गांधींचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही; भाई जगताप यांची भाजपवर टीका

banner 468x60

Share This:

मुंबई : दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसच्या वतीने बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या या आंदोलनावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडीओ पाहिला तर राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला. त्यावर आता भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
घरात बसल्यावर अपघात घडत नाही. मामु म्हणजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील जनतेच्या समस्या काय कळणार. तो एक अपघात होता, असं म्हणत भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.
राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही. यामुळे टीका होत असेल पण जनतेचा पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधाततला आक्रोश पंतप्रधानांपर्यंत पोहोचला असेल तर त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!