banner 728x90

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लवकरच लोकलनं प्रवास करण्याची मुभा पालिका देणार

banner 468x60

Share This:

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी कधी सुरू होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे. सर्वच जण लोकल ट्रेन कधी सुरु होणार हा एकच प्रश्न विचारत आहेत. या वाढत्या मागण्या लक्षात घेता मुंबई महापालिका एक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात येत्या 15 जुलै रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्यासह इतर निर्बंध आणि नियमांतही शिथिलता आणण्यासंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांसाठी लोकल सेवा लवकरच सुरु करण्याची शक्यता आहे. नागरिकांना कार्यालयात आणि इतर ठिकाणी लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्याचा विचार पालिका करत आहे. मुंबईत सध्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. मात्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता असल्यानं राज्य सरकार निर्बंध शिथील करताना विचार करत आहे. 
पालकमंत्री असलम शेख यांनी याबाबत सांगितले की, ट्रेनमध्ये लोकांना कशाप्रकारे प्रवास करण्याची संधी देता येईल, हॉटेल दुकानांची वेळ कशी वाढवता येईल, कपड्याची दुकानं कशी उघडता येईल हे पाहत आहोत. ट्रेनचा विचार करताना तिसऱ्या लाटेचा विचार करावा लागतोय, 100 टक्के लोकांना त्रास होतोय हे मान्य आहे. सगळ्या पॅरामीटरचा विचार करतोय. जोपर्यंत 50 ते 60 टक्के लोकांना लसीकरण होत नाही तोपर्यंत कठीण आहे. अशीही माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!