पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी आता किती दिवस विरोधात बसणार?, असा सवाल केला. यावर देवेंद्र फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
‘तोपर्यंतच आम्ही विरोधात बसणार आहोत’; देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार आहोत, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सहकार खात्यावरून भाजपवर टीका केली होती. त्यावर फडणवीसांनी राऊतांना फटकारले. राऊतांना सर्व गोष्टी माहीत आहेत, असं तुम्हाला का वाटतं? तेच पंडित आहेत, त्यांनाच सर्व काही समजतं. त्यांनाच संविधान समजतं हा तुमचा गैरसमज आहे. इतके वर्ष एनसीडीसीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले. ते कशाच्या अखत्यारीत दिले होते?, असा सवाल फडणवीसांनी केला.
इंधन दरवाढीवरून सत्ताधारी आघाडीने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यावरही फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. या सरकारमधील एखाद्या मंत्र्याला त्याच्या बायकोने मारलं तरी हे म्हणतील त्यात केंद्राचा हात आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.
दरम्यान, यंदाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसातच गुंडाळण्यात आले. या अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी नियुक्त केलेल्या भास्कर जाधव यांनी अधिवेशन गाजवलं होतं. त्यांनी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बाचाबाचीमुळे ते अधिवेशनानंतर देखील चर्चेत आले होते.
Recommendation for You

Post Views : 62 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 62 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 62 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 62 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












