मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून 4 जणांची वर्णी केंद्रिय मंत्रीमंडळात लागली आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचाही समावेश आहे. राणे यांची काॅबिनेट मंत्रीपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना आणि राणे कुटूंबियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
Home
पालघर
‘रेमडेसिवीरनंतर आता महाराष्ट्रात ‘बर्नोल’ची मागणी वाढतीये खासकरून…’; नितेश राणेंची महाविकास आघाडीवर जहरी टीका
‘रेमडेसिवीरनंतर आता महाराष्ट्रात ‘बर्नोल’ची मागणी वाढतीये खासकरून…’; नितेश राणेंची महाविकास आघाडीवर जहरी टीका
रेमडेसिवीरनंतर आता महाराष्ट्रात ‘बर्नोल’ची मागणी वाढतीय खासकरून ज्या लोकांनी हातात शिवबंधन बांधलंय त्यांच्यासाठी… बर्नोलचा सगळा स्टाॅक संपलाय, आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणात लक्ष द्यावं, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळं आता शिवसेना आणि नितेश राणे यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर लगेचच नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला टोले लगावले आहेत.
दरम्यान, नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा प्रवास मोठा आहे, सोपा नक्कीच नाही. हे येरागबाळ्याचं काम नाही. जे मिळालं त्यात आम्ही समाधानी असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं होतं. उरला प्रश्न शिवसेनेचा तर त्यांना आम्ही किंमत देत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी याआधी केली होती.
Recommendation for You

Post Views : 53 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 53 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 53 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 53 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












