banner 728x90

Modi Cabinet Expansion : मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा; देशाला मिळणार नवीन आरोग्यमंत्री

banner 468x60

Share This:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वर्तुळात गाठीभेटी सुरू होत्या. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात येत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशाला आता नवीन आरोग्यमंत्री मिळणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात आज मोठा फेरबदल करणार आहेत. या पूर्वीच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी आणि देवश्री बॅनर्जी यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.
त्या अगोदर मोदी यांनी आपल्या निवासस्थानी मंत्रीपदाच्या संभाव्य नेत्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हेही पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
 मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. कामगिरीच्या आधारे मंत्र्यांना काढून नवीन नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ता सुरजेवाला म्हणाले, “तेलाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तसेच डॉ. हर्षवर्धन यांनी खराब कोविड व्यवस्थापनामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा”
यासोबत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी केली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!