banner 728x90

मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्या; माजी मंत्री नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

banner 468x60

Share This:

मुंबई : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षणामुळे राजकारण तापले आहे. त्यात आणखी एका समाजाने आपल्या आरक्षणाच्या मागण्या मांडण्यास सुरवात केली आहे. त्यातच आता काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी मुस्लिम आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपली अरक्षणाबद्दलची भावना व्यक्त केली आहे.

माजी मंत्री नसीम खान यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. आरक्षण दिल्याशिवाय मुस्लिम समाजाचं मागासलेपण दुर होणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून बहाल करण्यात यावं, असेही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी 28 फेब्रुवारी रोजी अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिलं होतं, परंतु आजपर्यंत या विषयावर कोणत्याही प्रकारचा निर्णय अथवा सरकारतर्फे चर्चा सुद्धा करण्यात आली नाही, मुस्लिम समाजामधील मागासपणा दूर करण्यासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी देखील नसीम खाम यांनी केली आहे.
दरम्यान, मुस्लीम आरक्षणासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे थेट मैदानात उतरले आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात निदर्शने आंदोलन करण्यात आली. त्यात त्यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!