मुंबई : योगेश चांदेकर – मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित कला-दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी 3 जुलै रोजी आपल्या पुण्यातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट आणि एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यातूनच त्यांना काही व्यक्ती त्रास देत असल्याचे समोर आलं होतं.
Home
पालघर
दिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना व खंडणीखोरांना तात्काळ अटक करा, विविध संघटनांची मागणी
दिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना व खंडणीखोरांना तात्काळ अटक करा, विविध संघटनांची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. शिवाय व्यवसायिक नुकसान करण्याची ही धमकी देण्यात आली होती. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असंही तक्रारीत म्हटलेलं आहे.
साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गंगेश्वरलाल श्रीवास्तव, राकेश मौर्य, अशोक दुबे, बी.एन. तिवारी या आरोपींना व खंडणीखोर गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी, फिल्म, टेलिव्हिजन, एंटरटेनमेंट, ऍड इंडस्ट्री वर्कर युनियनतर्फे दिंडोशी पोलीस चौकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे चेअरमन अनुप दादा मोरे, जनरल सेक्रेटरी नितीन मधुकर कोदे, सिनिअर व्हाईस चेअरमन सुरेश मोरे, खजिनदार अनिकेत बांदल, व्हाईस चेअरमन राजू महाडिक, गिरीश नायर, मुरगन तेवर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Recommendation for You

Post Views : 48 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 48 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 48 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 48 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












