banner 728x90

वसुलीच्या आड येतो म्हणून, परमवीर सिंग यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले – सहाय्यक पोलिस आयुक्तांचा गौप्यस्फोट

banner 468x60

Share This:

मुंबई : वसुलीच्या आड येतो म्हणून, परमवीर सिंग यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. असा गंभीर आरोप सहायक पोलिस आयुक्त निपूंगे यांनी केला आहे. आपण आदिवासी असल्याने जाणीवपूर्वक आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

परमवीर सिंग यांनी  मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या कारकिर्दीत कशी सोन्याची मागणी केली होती. याची माहिती समोर आल्यानंतर, आता त्यांच्या कृष्णकृत्यांचा पाढा सहाय्यक पोलीस आयुक्त निपुंगे यांनी वाचला आहे. 
परमबीर सिंग वाहतूक शाखेत कार्यरत असताना, हाताखालच्या अधिकाऱ्यांना वसूली करायला भाग पडायचे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने वसुली केली नाही, तर त्याला एखाद्या प्रकरणात अडकून द्यायचे. असा गंभीर आरोप निपुंगे यांनी केला आहे. एका महिला पोलीस शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी आपल्याला कसे गोवण्यात आले. मुद्दाम तुरूंगात टाकण्यात आले, जामीन मिळू नये यासाठी कसे प्रयत्न केले. याची माहिती त्यांचे सहकारी असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त कदम यांनी दिली आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. घाडगे यांनी केले होते. तसेच निपुंगे यांना गोवण्यात आलेल्या सुभद्रा आत्महत्या प्रकरणातील महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन देखील डॉ. घाडगे यांनीच केले होते. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
निपुंगे याबाबतचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांना दिला आहे. या व्हिडीओमध्ये निपुंगे यांना कसे अडकवण्यात आले. याची सविस्तर माहिती कदम यांनी दिली आहे. सदर महिलेची आत्महत्या नव्हे, तर खून झाला होता आणि तो तिच्याच प्रियकराने केल्याचे माहित असूनसुद्धा, तुम्हाला खात्यातून दूर करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा बनाव रचला असल्याचे कदम यांनी या व्हिडीओत सांगितले आहे.
 
पोलीस दलात आपल्या स्वार्थासाठी एका महिलेच्या खुनाच्या प्रकरणाला आत्महत्येचा रंग देत, त्या महिलेला न्याय न देता, उलट वसूलीच्या आड येणाऱ्या एका अधिकाऱ्यांलाही परमवीर सिंग यांनी अडकवून काटा काढल्याचा आरोप, निपुंगे यांनी केला आहे. निपुंगेंनी या प्रकरणाबाबत परमबीर सिंग यांच्या चौकशीची मागणी केली असून, अशा भ्रष्ट आणि कपटी अधिकाऱ्याला योग्य शिक्षा मिळावी आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांना बळ मिळावे, अशी मागणी केली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Response (1)

  1. It also makes it extremely fast and simple to find out|to search out} your way across the massive number of video games on offer. These embody a massive slots catalogue, along with table recreation favorites such as blackjack and roulette. Whether 코인카지노 you’re looking to play blackjack, slots, selection of|quite lots of|a wide selection of} tables video games, or sit down with a live dealer, this website has almost each choice you would consider.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!