banner 728x90

कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता

banner 468x60

Share This:

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना आता उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासोबत बैठक घेतली असून, या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे. मोदींच्या निवासस्थानी ही मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक पार पडली. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा बुधवारी होण्याची शक्यता असम, बुधवारीच मंत्र्यांचा शपथविधी पार पडले जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास मे 2019 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला विस्तार असणार आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आणि सुशील मोदी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नारायण राणे आणि हिना गावीत यांचीही नावं चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश हे सर्वाधिक महत्त्वाचे राज्य आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम बंगालचं प्रतिनिधित्व वाढू शकतं. भाजप सहकारी पक्ष जेडीयू आणि अपना दल (एस) ला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात आरपीआयचे नेते रामदास आठवले हे एकमेव गैर भाजप नेते आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या 53 मंत्री आहेत. नियमानुसार मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या ही 81 आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!