banner 728x90

वाणगाव रस्त्याच्या प्रश्नावरून भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक

banner 468x60

Share This:

डहाणू : योगेश चांदेकर – डहाणूतील वाणगाव पश्चिम या भागात रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाणगाव मार्केट मेन रोड (चिंचणी रोड) ते वाणगाव आयटीआय या मुख्य रस्त्यावर खड्डयांचा साम्राज्य पसरला आहे. तालुक्यातील अनेक गावांना जोडण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने, या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जाधव यांच्याशी या प्रकरणाबाबत पत्रव्यवहार करण्यात आले असून, 15 दिवसात जर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर, भारतीय जनता युवा मोर्चा तीव्र आंदोलन करेल. असा इशारा देण्यात आला आहे.

सदरील रेल्वे पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, सध्या ते काम संथगतीने सुरू आहे. पुलाचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी मातीची ढिगारे होती. मात्र पाऊस पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचले आहे. सदरील बायपास रस्ता हा आजूबाजूच्या 80 ते 90 गाव जोडण्यासाठी तयार करण्यात आला होता. जेणेकरून ग्रामस्थांना रुग्णालयात, बँकेत, पोलीस स्टेशन अशा  महत्त्वाच्या ठिकाणी जाता येईल. मात्र या रस्त्यावर चिखल साचल्याने रस्त्यावर पायी चालणेही हलाकीचे झाले आहे. वाणगाव हनुमान मंदिराजवळ कोविड सेंटर असून, येथे येणाऱ्या रुग्णांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 ज्या कंत्राटदाराला ह्या पुलाचे काम देण्यात आले आहे, त्याने बस स्टँड जवळ मोठा खड्डा खणून ठेवला आहे. रस्त्याचा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दगडही साचले आहेत. तसेच पावसाचे दिवस सुरू असल्याने या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने ये-जा करणाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कित्येक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहे. त्यामुळे नागरिक या रस्त्याला वैतागले असून, ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. पुढील 15 दिवसात या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामस्थांनाच्या मदतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. अशी मागणी जिल्हा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सचिव गौरव धोडी , कायदा प्रकोष्ठ डहाणू तालुका अध्यक्ष स्वप्निल दवणे, वकील आशुतोष दुबे यांनी केली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!