banner 728x90

धक्कादायक! लॉकडाऊन आणि कर्जबाजारीपणामुळे जळगावात सलून व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

Share This:

जळगाव : कोरोनाने देशात शिरकाव केला आणि देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून अनेक जण बेरोजगार झाले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने व कर्जबाजारी झाल्याने जळगावातील एका सलून व्यवसायिकाने आत्महत्येचं पाऊल उचलले आहे. गजानन कडू वाघ (वय 35 राहणार लक्ष्मीनगर) असे मृत सलून व्यवसायिकाचे नाव असून, रविवारी सकाळी 8.30 दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे.

गजानन वाघ गेल्या वर्षीपासून माळपिंप्री हे गाव सोडून जळगाव शहरात स्थायिक झाले होते. लक्ष्मीनगरात खोली भाड्याने घेऊन तिथे ते पत्नी व दोन मुलांसह राहत होते. एका सलून दुकानावर कारागीर म्हणून ते काम करीत होते. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे देशातील संपूर्ण व्यवसाय बंद पडली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला होता. सुरुवातीच्या काळात सलून दुकानदारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. मात्र लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली. त्यातून त्यांनी हातउसनवारी करून घरखर्च भागवण्यास सुरुवात केली.
लॉकडाऊन शिथिल झाल्यांनतरही पुरेसे काम त्यांना मिळत नव्हते. डोक्यावरील कर्ज वाढत चालले होते. यातून पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाला होता. याच विंवचनेत असलेल्या वाघ यांनी शनिवारी मध्यरात्री राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी 8.30 वाजता त्यांच्या पत्नी सरला यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा सुरू केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. वाघ यांना खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. रविवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी माळपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत गजानन वाघ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई लताबाई, मुलगा ऋषीकेश (वय 5) व मुलगी वैष्णवी (वय 3) असा परिवार आहे. वाघ यांनी हे पाऊल उचलल्याचे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!