banner 728x90

अमित शाहांच्या हातात महाराष्ट्राच्या राजकारणाची किल्ली? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण

banner 468x60

Share This:

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी लक्ष्मीनारायण मंदिर माधवबागच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थिती लावली. राज्यामध्ये लवकरच निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे.

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढील चार महिन्यामध्ये घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमुळे अमित शाह यांचा हा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे.

banner 325x300

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. तर नाराज असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपद देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना मुंडेंचे खाते दिल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. भुजबळ यांच्या मंत्रिपदावर महायुतीमधील काही नेत्यांनी टीका केली. तसेच यामुळे नाशिक पालकमंत्रिपदाचा मुद्दा देखील आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पवार कुटुंब एकत्र येण्याची देखील चर्चा सुरु आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली असल्याचा अंदाज आहे.

अमित शाह आणि अजित पवार यांची सह्याद्री अतिथी गृहावर 20 मिनिटे बैठक झाली. या बैठकीचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी त्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अमित शाह यांना देखील धन्यवाद मानले, यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. तसेच लवकरच निवडणूका असल्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. महायुतीमधील ही नाराजी आणि आगामी निवडणूकासंदर्भात अमित शाह आणि अजित पवारांची भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सहयाद्री अतिथीगृहावर त्यांची ही भेट झाली असून यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणाचे अनेक विषय हे अमित शाह यांच्या नेतृत्वामध्ये घेतले असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!