Breaking News
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या हालचाली, चार महत्त्वाचे शासकीय आदेश काढले, मराठा समाजाला काय फायदा मिळणार? Driving Licence New Rules : तर थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा, नवी पॉइंट सिस्टीम आहे तरी काय? मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर वेदमूर्ती गजानन नामजोशी यांचे निधन वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य त्यांच्या मार्गदर्शनातून पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचे वेदाध्ययन …. तर ‘या’ महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद ? आजपासून लागू झालेला नवा नियम कोणता ?
banner 728x90

मराठीचं शिक्षण देणाऱ्या ॲपची निर्मिती करणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती

banner 468x60

Share This:

पुढील दोन महिन्यात आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी बोलता यायला हवे. महिनाभरात पहिल्या पाच हजार अमराठी लोकांसाठी एक ॲप तयार करण्‍यात येणार आहे.

त्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत मोफत मराठी शिकवणी दिली जाणार आहे, अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात राज्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी उदय सामंत उपस्थित होते. यावेळी त्यांनी आगामी काळात महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि मराठी भाषेबाबत आपली भूमिका मांडली.

उदय सामंत म्‍हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी यायला हवी अशी आमची इच्छा आहे. मात्र त्यावर कानशिलात लगावणं हा उपाय नाही. त्यापेक्षा आपण ॲप तयार करू. जर त्याने शिकायला नकार दिला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र मराठी भाषा शिकविण्यासाठी मारहाण करणं योग्य नाही. त्याऐवजी आम्ही ॲप तयार करत आहे. मात्र अमराठी लोकांनी वेळ काढून या ॲपच्या साहाय्याने मराठी भाषा शिकायला हवी, असे ते म्हणाले.

दरम्‍यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू आहे. याची परिणीती मारहाणीत होत आहे. अनेक ठिकाणी मराठी-अमराठीच्या मुद्द्यावरुन अमराठींना मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत उदय सामंत यांना प्रश्न करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती करुन आता मराठीचे गुणगाण गाणे चुकीचे आहे. ‘म’ मराठीचा राहिलेला नाही, ‘म’ आता महापालिकेचा आणि मतांचा झाला आहे, असा टोला त्‍यांनी लगाविला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!