नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण कमी झाला असून, गेल्या 24 तासात 58 हजार 562 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 537 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2 कोटी 98 लाख इतका झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 7 लाख 24 हजार जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत कोरोनामुळे 3 लाख 86 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे, आतापर्यंत 2 कोटी 87 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे.