पालघर-योगेश चांदेकर
पालघर आगारात वैद्यकीय उपचार शिबीर
पालघरः शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्यभरात रुग्णसेवेचे मोठे काम करीत आहे. हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार आमदार राजेंद्र गावित यांनी काढले.
पालघर आगारात कर्मचारी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, पालघर जिल्हा रुग्णालय तसेच आयडिएल हॉस्पिटल वाडा, आणि आर. जी. फाउंडेशनच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते
आरोग्य शिबिराचे कौतुक
या शिबिराचे उद्घाटन आमदार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी,शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, माजी नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे, आयडियल मेडिकल कॉलेज आणि फाउंडेशनच्या संचालक चहक जैन, परिवहन विभागाचे तांत्रिक अधिकारी नीलेश धारगावे, आगार व्यवस्थापक सुजीत घोरपडे, आयडियलचे मेडिकल हेड डॉ. भवानी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडवोकेट नीलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी शिवसेनेच्या वैद्यकीय मदत पक्षाचे तसेच या आरोग्य शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले.
४६८ रुग्णांची तपासणी
या वेळी नागरिकांनी गर्दी केली होती. ४६८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार गावित, आयडियल हॉस्पिटलच्या संचालक चहक जैन, आरजी फाउंडेशनचे रोहित गावित आणि ॲडवोकेट नीलेश राऊत यांचे आभार मानण्यात आले. वैद्यकीय शिबिर यशस्वी होण्यासाठी नीलेश राऊत, वसई तालुकाप्रमुख प्रथमेश बांदेकर, केळवा विभाग प्रमुख दीपेश घरत, डहाणू तालुकाप्रमुख अक्षय मर्दे, पालघर तालुका उपप्रमुख डॉक्टर सचिन निकम, हेमंत शेलार, सफाळे शहर प्रमुख प्रसाद कुडू, उपविभाग प्रमुख राजेंद्र मोहिते नालासोपारा पूर्व विभाग प्रमुख निखिल शिगवण, गणेश सांबरे, प्रमोद पवार, सुहास रावते, मोहित पवार, शशिकांत घरत, अजय संखे, सुहास राऊत आदींनी विशेष परिश्रम घेतले.