banner 728x90

दहावी-बारावी परीक्षेची माहिती मिळणार आता एका क्लिकवर; महाराष्ट्र बोर्डाने तयार केले मोबाईल अ‍ॅप

banner 468x60

Share This:

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावी-बारावीच्या परीक्षासंदर्भात अधिकृत वेळापत्रक, प्रारूप प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि अन्य माहिती आता विद्यार्थी-पालकांना मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) या मोबाइल ॲपची निर्मिती केली आहे.

banner 325x300

गेल्या काही वर्षांत दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षकांना नेमकी आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या ‘एमबीएसएसई’ या मोबाइल ॲपची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंडळाचे संकेतस्थळ असले, तरी सध्याच्या काळात मोबाईलचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र मोबाइल ॲप उपयुक्त ठरू शकते. गुगल प्ले स्टोअरवरून, राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील दुव्याद्वारे ॲप विनामूल्य डाउनलोड करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दहावी, बारावीच्या परीक्षा, राज्य मंडळासंदर्भातील समाजमाध्यमांतील माहितीची सत्यासत्यता ॲपद्वारे पडताळून पाहता येईल. या ॲपवर दहावी-बारावीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक, गेल्या दोन वर्षांतील प्रारूप प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि अन्य सूचना, माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे हे ॲप उपयुक्त ठरणार असल्याचेही गोसावी यांनी नमूद केले आहे .

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!