औरंगाबाद : सलमान शेख – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि कमी प्रवास संख्या यामुळे इंडिगोने औरंगाबादहून सुरू असलेली सर्व विमाने रद्द केली होती. मात्र आता कोरोनाचा प्रकोप ओसरल्याने अखेर इंडिगोने विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 5 जुलैपासून दिल्ली ते हैदराबाद विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. त्यामुळे बंद झालेली हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस तर औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून चार दिवस चालणार आहे. सध्या शहरात एअर इंडियाची विमानसेवा सुरू असून, मुंबई आणि दिल्ली प्रवास विमानसेवा उपलब्ध आहे. इंडिगोकडून लवकरच औरंगाबाद- बंगळुरु आणि अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होणार आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे इंडिगोने आपली सेवा बंद केली होती. मात्र आता औरंगाबादकरांना इंडिगोच्या विमानसेवेचा लाभ मिळणार आहे.
इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान 5 जुलैपासून पुन्हा घेणार औरंगाबादेत ‘उड्डाण’
Recommendation for You

Post Views : 82 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 82 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 82 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 82 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












