औरंगाबाद : सलमान शेख – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि कमी प्रवास संख्या यामुळे इंडिगोने औरंगाबादहून सुरू असलेली सर्व विमाने रद्द केली होती. मात्र आता कोरोनाचा प्रकोप ओसरल्याने अखेर इंडिगोने विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 5 जुलैपासून दिल्ली ते हैदराबाद विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. त्यामुळे बंद झालेली हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस तर औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून चार दिवस चालणार आहे. सध्या शहरात एअर इंडियाची विमानसेवा सुरू असून, मुंबई आणि दिल्ली प्रवास विमानसेवा उपलब्ध आहे. इंडिगोकडून लवकरच औरंगाबाद- बंगळुरु आणि अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होणार आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे इंडिगोने आपली सेवा बंद केली होती. मात्र आता औरंगाबादकरांना इंडिगोच्या विमानसेवेचा लाभ मिळणार आहे.
इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान 5 जुलैपासून पुन्हा घेणार औरंगाबादेत ‘उड्डाण’
Recommendation for You

Post Views : 125 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 125 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 125 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 125 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 125 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg