वाडा : संजय लांडगे – ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ओबीसी समाजातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आज (24 जून) पालघर जिल्ह्यातील सर्वच तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
ओबीसींचे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने पुनर्प्रस्थापित करावे, पदोन्नतीतील रद्द केलेले आरक्षण पुर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी या तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आक्रोश आंदोलन करण्यात आल्याचे वाडा तालुका ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष संदीप पवार यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे पालन करुन आयोजित केलेल्या या आक्रोश आंदोलनामध्ये ओबीसी समाजातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ओबीसीच्या एका झेंड्याखाली एकत्र आले होते. या आक्रोश आंदोलनात काही सामाजिक कार्यकर्ते तसेच ओबीसी समाजातील शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष संदिप पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ओबीसी समितीचे नरेश आकरे, निलेश गंधे, दिलीप पाटील, उमेश खिराडे यांच्यासह सर्वच पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसींच्या मागण्यांच्या घोषणा देऊन तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
Recommendation for You

Post Views : 62 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 62 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 62 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 62 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












