वाडा : संजय लांडगे – ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ओबीसी समाजातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आज (24 जून) पालघर जिल्ह्यातील सर्वच तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
ओबीसींचे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने पुनर्प्रस्थापित करावे, पदोन्नतीतील रद्द केलेले आरक्षण पुर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी या तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आक्रोश आंदोलन करण्यात आल्याचे वाडा तालुका ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष संदीप पवार यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे पालन करुन आयोजित केलेल्या या आक्रोश आंदोलनामध्ये ओबीसी समाजातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ओबीसीच्या एका झेंड्याखाली एकत्र आले होते. या आक्रोश आंदोलनात काही सामाजिक कार्यकर्ते तसेच ओबीसी समाजातील शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष संदिप पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ओबीसी समितीचे नरेश आकरे, निलेश गंधे, दिलीप पाटील, उमेश खिराडे यांच्यासह सर्वच पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसींच्या मागण्यांच्या घोषणा देऊन तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
Recommendation for You

Post Views : 123 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 123 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 123 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 123 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 123 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg