मुंबई : राज्यात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. राज्यात आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम राज्यात होतांना पाहायला मिळत आहे.
दिलासादायक! राज्यात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत लक्षणीय घट
राज्यात गेल्या 24 तासात 07 हजार 603 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 53 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.15 टक्के इतका असून, आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने तसेच मुंबईतील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल रेल्वे सर्वसामान्य जनतेसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, मुंबई लोकल आता पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.
Recommendation for You

Post Views : 55 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 55 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 55 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 55 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












