मुंबई : राज्यात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. राज्यात आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम राज्यात होतांना पाहायला मिळत आहे.
दिलासादायक! राज्यात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत लक्षणीय घट
राज्यात गेल्या 24 तासात 07 हजार 603 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 53 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.15 टक्के इतका असून, आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने तसेच मुंबईतील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल रेल्वे सर्वसामान्य जनतेसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, मुंबई लोकल आता पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.
Recommendation for You

Post Views : 115 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 115 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 115 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 115 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 115 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg