banner 728x90

पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर, राज्य सरकारचा फायदा – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

banner 468x60

Share This:

मुुंबई : बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर, राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विधानपरिषदेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर बोलताना प्रविण दरेकर यांनी पीक विम्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बीड पॅटर्नचा विरोध केला.

बीड पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त 13 कोटी 42 लाख रुपये मिळाले असताना, राज्य शासनाला यामध्ये 626 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. जे लाखो शेतकरी क्लेम सादर करू शकले नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही.
पीक विमा योजनेमध्ये या सरकारच्या काळात 138 लाख शेकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला होता. त्यापैकी 15 लाख शेतकऱ्यांना परतावा दिला गेला. जेवढी रक्कम कंपन्यांकडे जमा झाली त्यापैकी फक्त 18 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. या सरकारच्या कृपेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा फायदा झाला, असं म्हणत प्रविण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या. पण अद्याप कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मदत मिळाली नाही. असा आरोप दरेकर यांनी केला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!