मुुंबई : बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर, राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विधानपरिषदेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर बोलताना प्रविण दरेकर यांनी पीक विम्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बीड पॅटर्नचा विरोध केला.
Home
पालघर
पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर, राज्य सरकारचा फायदा - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर, राज्य सरकारचा फायदा – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
बीड पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त 13 कोटी 42 लाख रुपये मिळाले असताना, राज्य शासनाला यामध्ये 626 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. जे लाखो शेतकरी क्लेम सादर करू शकले नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही.
पीक विमा योजनेमध्ये या सरकारच्या काळात 138 लाख शेकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला होता. त्यापैकी 15 लाख शेतकऱ्यांना परतावा दिला गेला. जेवढी रक्कम कंपन्यांकडे जमा झाली त्यापैकी फक्त 18 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. या सरकारच्या कृपेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा फायदा झाला, असं म्हणत प्रविण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या. पण अद्याप कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मदत मिळाली नाही. असा आरोप दरेकर यांनी केला.
Recommendation for You

Post Views : 126 पालघर – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.. रामदास आठवले…

Post Views : 126 पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली…

Post Views : 126 पालघर– मोखाडा तालुक्यातील घाणवळ परिसरातील दोन महिन्यांच्या बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची…














zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg