नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने 12 वीच्या निकालाची पद्धत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. बोर्डाने बारावीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल असे न्यायालयात म्हटले आहे. दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही इयत्तेचा विचार करता 30:30:40 ही प्रणाली वापरून गुण देण्यात येणार आहे. दहावी आणि अकरावी या इयत्तेत सर्वाधिक गुण असलेल्या 5 विषयांपैकी 3 विषयाचे गुण आधारभूत केले जाणार आहे. त्यानंतर 12 वी इयत्तेतील चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा, प्रॅक्टिकल यामध्ये मिळालेल्या गुणांचा विचार करून 12 वी चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावी आणि अकरावीच्या गुणांचा प्रत्येकी 30 टक्के आणि 12 वीच्या गुणांचा 40 टक्के याप्रमाणे मूल्यांकन केले जाणार आहे. आणि निकाल 31 जुलै रोजी घोषित करण्यात येणार आहे.
सीबीएसई बोर्डाचा ’12 वी’चा निकाल 31 जुलैला जाहीर होणार
दरम्यान, देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शिक्षण प्रणाली ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे आता 10 आणि 11 च्या गुणांवर 12 वीचे गुण मिळणार आहे.
Recommendation for You

Post Views : 26 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 26 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 26 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 26 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…