नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने 12 वीच्या निकालाची पद्धत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. बोर्डाने बारावीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल असे न्यायालयात म्हटले आहे. दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही इयत्तेचा विचार करता 30:30:40 ही प्रणाली वापरून गुण देण्यात येणार आहे. दहावी आणि अकरावी या इयत्तेत सर्वाधिक गुण असलेल्या 5 विषयांपैकी 3 विषयाचे गुण आधारभूत केले जाणार आहे. त्यानंतर 12 वी इयत्तेतील चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा, प्रॅक्टिकल यामध्ये मिळालेल्या गुणांचा विचार करून 12 वी चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावी आणि अकरावीच्या गुणांचा प्रत्येकी 30 टक्के आणि 12 वीच्या गुणांचा 40 टक्के याप्रमाणे मूल्यांकन केले जाणार आहे. आणि निकाल 31 जुलै रोजी घोषित करण्यात येणार आहे.
सीबीएसई बोर्डाचा ’12 वी’चा निकाल 31 जुलैला जाहीर होणार
दरम्यान, देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शिक्षण प्रणाली ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे आता 10 आणि 11 च्या गुणांवर 12 वीचे गुण मिळणार आहे.
Read Also
Recommendation for You

Post Views : 74 पालघर-योगेश चांदेकरकामात अनियमितता, पावसाळ्यात कामे वाहून जाण्याची भीती पालघरः पालघर जिल्ह्यासाठी…

Post Views : 74 पालघर-योगेश चांदेकर राजकारणात कायम शत्रू समजून एकमेकांना संपवण्याचं राजकारण करायचं नसतं,…

Post Views : 74 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…













