मुंबई : यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 12 आमदारांना निलंबित केल्यामुळे सत्ताधारी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. त्याच्या निषेधार्थ आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपकडून शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते दादरच्या शिवसेना भवन परिसरात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवसेना भवन परिसरात बंदोबस्ताला लागले आहेत.
12 आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मुंबईत आज भाजपचे आंदोलन; सेनाभवनाला शिवसैनिकांचा पहारा
यावर प्रतिक्रिया देताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मागचा मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर त्यांना आम्ही अद्दल घडवली होती. भाजपने त्यातून शिकायला हवे होते. पण दुर्दैवाने भाजप ही जुनी भाजप राहिलेली नाही. भाजपने काही नवीन लोकांना पक्षात घेतल्याने त्यांना शिवसेना भवनाचे महत्त्व माहिती नाही. जुन्या लोकांना त्याचे महत्त्व माहिती होते. शिवसेना भवन पवित्र वास्तू आहे. या पवित्र वास्तूमुळे भाजपही महाराष्ट्रात मोठी झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मोर्चा काढणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शेवाळे यांनी दिली.
Recommendation for You

Post Views : 47 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 47 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 47 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 47 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












