मुंबई : यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 12 आमदारांना निलंबित केल्यामुळे सत्ताधारी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. त्याच्या निषेधार्थ आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपकडून शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते दादरच्या शिवसेना भवन परिसरात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवसेना भवन परिसरात बंदोबस्ताला लागले आहेत.
12 आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मुंबईत आज भाजपचे आंदोलन; सेनाभवनाला शिवसैनिकांचा पहारा
यावर प्रतिक्रिया देताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मागचा मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर त्यांना आम्ही अद्दल घडवली होती. भाजपने त्यातून शिकायला हवे होते. पण दुर्दैवाने भाजप ही जुनी भाजप राहिलेली नाही. भाजपने काही नवीन लोकांना पक्षात घेतल्याने त्यांना शिवसेना भवनाचे महत्त्व माहिती नाही. जुन्या लोकांना त्याचे महत्त्व माहिती होते. शिवसेना भवन पवित्र वास्तू आहे. या पवित्र वास्तूमुळे भाजपही महाराष्ट्रात मोठी झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मोर्चा काढणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शेवाळे यांनी दिली.
Recommendation for You

Post Views : 87 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 87 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 87 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg