औरंगाबाद : सलमान शेख – मोदी सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद शहरात तरूणाई मंडळीकरून जोरदार प्रतिसाथ मिळाला आहे. गेल्या 5 दिवसात सुमारे 60 हजार तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे शहरात लसीकरणाचा 4 लाखांचा टप्पा पार पूर्ण झाला आहे. उर्वरित दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक आता विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. शहरात दररोज 12 ते 14 हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. असे असताना 22 जूनपर्यंत 69 केंद्राच्या माध्यमातून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजिले होते. 24 जूनपर्यंत शहरात 3 लाख 93 हजार 153 जणांचे लसीकरण झाले होते. त्यात 18 ते 44 वयोगटातील संख्या 76 हजार 765 एवढी होती. शुक्रवारी दिवसभरात 14 हजार पेक्षाही अधिक लसीकरण झाल्याने शहराने लसीकरणाचा 4 लाखाचा टप्पा पाड केला आहे.
कौतुकास्पद! औरंगाबादकरांनी पार केला लसीकरणाचा ‘चार’ लाखांचा टप्पा
दरम्यान, शहरात जलतगतीने लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने विविध सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विविध सोसायट्यामध्येही आता लसीकरण केले जाणार आहे.
Recommendation for You

Post Views : 30 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 30 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 30 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 30 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…