banner 728x90

दिलासादायक! राज्यात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 9,830 नवे कोरोना रुग्ण

banner 468x60

Share This:

मुंबई: राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 9 हजार 830 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 236 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 59 लाख 44 हजार 710 इतका झाला असून, मृतांचा आकडा 16 हजार 26 झाला आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात 1 लाख 39 हजार 960 जणांवर उपचार सुरू आहेत. 

गेल्या 24 तासात 5 हजार 890 जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत 56 लाख 85 हजार 636 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 95.64 टक्के इतका आहे. 
दरम्यान, राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना संबंधित शासनाने लादलेले नियम पाळणे गरजेचे आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!