banner 728x90

हा आहे अशोक-निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा, अभिनय नव्हे या हटके क्षेत्राची केली निवड

banner 468x60

Share This:

वेब टीम

सध्या छोट्या पडद्यावर ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका गाजत आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावर दर्शन घडले आहे. त्यांनी साकारलेली आसावरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेत त्या एका मुलाची आई आहेत. खासगी आयुष्यातही निवेदिता सराफ एका मुलाच्या आई आहेत. अनिकेत सराफ हे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव आहे. पण अनिकेत सराफने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट चोखाळली नाही हे विशेष. अनिकेतने एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

https://www.instagram.com/nicksaraf/?utm_source=ig_embed 
 

खरं तर अशोक सराफ यांचे जवळचे मित्र लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांची मुले अभिनय बेर्डे, श्रिया पिळगावकर आणि आदिनाथ कोठारे त्यांच्या वडिलांच्याच क्षेत्रात नाव कमावत आहेत. पण अनिकेत सराफ मात्र याला अपवाद ठरला आहे. विशेष म्हणजे हे वेगळे क्षेत्र निवडून त्याने आई निवेदिता सराफ यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!