banner 728x90

मेट्रो पूर्णपणे बंद करू नका, लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न; सु्प्रीम कोर्टाचे सरकारला आदेश

banner 468x60

Share This:

राजधानी दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘सीजेपी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली असून, याचा थेट आणि मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

तब्बल ५७ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहे. दरम्या मेट्रो स्थानकं बंद ठेवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांवरील निर्बंधांचा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाला. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा आणि रोजीरोटीचा प्रश्न अधोरेखित केला.

आंदोलनाचे आयोजक उपस्थित नसतानाही मेट्रो स्थानकं बंद ठेवली जात असल्याबद्दल आम्हाला गंभीर चिंता आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नोंदवले. गुरुग्राम, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि इतर भागांतून लाखो लोक आपल्या रोजीरोटीसाठी दररोज प्रवास करतात. मेट्रो स्थानकं बंद ठेवल्यामुळे या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याकडेही सरन्यायाधीशांनी लक्ष वेधले. दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवांवर निर्बंध घालण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुरक्षेच्या उपाययोजना करताना सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांचाही विचार होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या या निरीक्षणातून स्पष्ट होते

banner 325x300

मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करू नका, ट्रेनची वारंवारता कमी करा, सुप्रीम कोर्टाची सूचना


दिल्लीतील मेट्रो स्थानकांवरील निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची सूचना केली आहे. मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्याऐवजी ट्रेनची वारंवारता कमी करा, असे न्यायालयाने सॉलिसिटर जनरल यांना सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध लावताना सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेण्याची भूमिका न्यायालयाने मांडली. दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा आणि प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे.
9 ऑक्टोबर रात्री 9 वाजल्यापासून निर्बंध

दिल्ली मेट्रोच्या ५७ स्थानकांवर आज, ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. हे निर्बंध १० ऑक्टोबर रोजीही पुढील आदेश मिळेपर्यंत कायम राहणार आहेत. मात्र, ज्या मेट्रो स्थानकांच्या नावापुढे स्टार म्हणजेच तारांकित चिन्ह आहे, त्या स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा सुरू राहणार आहे. केवळ नवी दिल्ली मेट्रो स्थानकावर इंटरचेंजची सुविधाही उपलब्ध नसेल. या निर्बंधांमुळे प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या मेट्रो मार्गाची माहिती घ्यावी आणि आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!